अक्षर वैभव पुरस्कार वितरण
अक्षर वैभव पुरस्कार वितरण
सेवेतून संस्कृती उदयाला आली : शिरीष चिटणीस*
नगर : माणसांनी एकमेकांची सेवा केली आणि संस्कृती उदयाला आली, असे प्रतिपादन सातारा येथील उद्योजक शिरीष चिटणीस यांनी केले. निमित्त होते अक्षरवैभव पुरस्कार वितरणाचे.
साहित्याक्षर प्रकाशन आणि अक्षरवैभव या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रहेमत सुलतान हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी साहेबराव ठाणगे,आबा सो उमाप, पुंजाहरी सुपेकर, बाळासो. चव्हाण यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. सुधाकर शेलार आणि अर्चना डावखर यांना पदमश्री विखे पाटील पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी साहेबराव ठाणगे यांनीसत्काराला उत्तर देताना'साहित्याक्षरचा पुरस्कार हा घरचा पुरस्कार आहे' वाल्याच्या पापात सहभागी न होता त्याचा वाल्मिकी होण्यास मदत करणारी पहिली स्त्री होती ' असे प्रतिपादन केले .
डॉ . सुधाकर शेलार यांनी सन्मानाला उत्तर देताना प्रतिपादन केले की, 'आधुनिकीकरणामुळे अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आणि आपण हातामध्ये रिमोट घेऊन रममाण झालो यात सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले .दुर्लक्ष झालेल्या प्रश्नांकडे समाजाला घेऊन जाण्याचे काम साहित्यिक करत असतो . '
आबासाहेब उमाप यांनी 'दलित आत्मकथनामध्ये बापाची भूमिका महत्त्वाची आहे . ती साहित्यात अधोरेखित झाली पाहिजे 'असे प्रतिपादन केले पुंजाहरी सुपेकर यांनी सत्काराला उत्तर देताना साहित्याक्षरचे आभार मानले आणि साहित्याक्षरने यानिमित्ताने आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे सांगितले .बाळासाहेब चव्हाण यांनी 'शेतकरी कायमच कर्जबाजारी कसा ?हा मध्यमवर्गीय आणि शेतकर्यापासून दूर असणाऱ्या लोकांना पडलेला प्रश्न ,शासनाचे दुर्लक्ष, शेतीमाल विक्रीतील दलाल यामुळे शेतकरी हतबल झाला आहे .काहीही झालं तरी शेतकऱ्याला उद्योजकासारखं पळून जाता येत नाही . असे सांगत साहित्या क्षरचे आभार मानले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रचना यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'आईपणाच्या कविता 'हा कार्यक्रम झाला . यात आई ही थीम घेवून सर्व कवींनी कविता सादर केल्या .या कार्यकमाचे सुत्रसंचालन डॉ. संजय बोरुडे यांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत अनेक किस्से सांगत आणि कविता . गात केले ., सुनील पवार, सुरेखा घोलप , ओम प्रकाश देंडगे, अर्चना डावखर , साहेबराव ठाणगे , दशरथ शिंदे रचना, संजय नगरकर आदी कवींनी बहारदार कविता सादर केल्या.
आभार डॉ. सय्यद महेबूब यांनी मानले.
याखेरीज डॉ. सूर्यकांत वरकड, पोपट पवार, विजय हाळगावकर या वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रचना, शब्बीर शेख आणि डॉ.महेबूब सय्यद यांनी यशस्वीपणे केले.