‘लोकधन’ या पुस्तकावर वाचक व अन्य साहित्यिकांनी दिलेले अभिप्राय
डॉ. संजय बोरुडे हे एक चतुरस्त्र लेखक आहेत तसेच इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांच्या ‘दै.सामना’मधील सदारांचे हे पुस्तक आणि त्यावर आलेल्या निवडक प्रतिक्रिया..
अकोला येथील प्रसिद्ध कवी आणि लेखक सुरेश पाचकवडे यांचा अभिप्राय.
प्रतिभा संगम साहित्य मंच, घोडेगाव या संस्थेचे अध्यक्ष रामदास सोनवणे यांचा अभिप्राय.
देविदास फुलारी के एक सशक्त कवि है । ऊनकी कविता का अनुवाद रचनाजी ने इतना जबरदस्त किया है की ये मराठी न होकर हिंदी कविता ही है, ऐसा लगता है। अनुवाद दो भाषाओम् के बीच का एक सेतू है और इस सेतू को मजबूत बनाने के लिये साहित्याक्षर का ये प्रयास जारी रहेगा ।
‘उलघाल ‘ हा कथासंग्रह नुकताच साहित्याक्षर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. प्रा . यशवंत माळी लिखित असलेला हा कथासंग्रह अत्यंत देखण्या स्वरूपात बाजारात उपलब्ध झालेला आहे. मुखपृष्ठ हे कथासंग्रहाचे शिर्षक असलेल्या ‘उलघाल ‘ या कथेवर सरदार जाधव यांनी रेखाटले आहे . मुखपृष्ठ हे घडीचे आहे. त्यातील मुखपृष्ठाच्या घडीवर प्रा . यशवंत माळी यांची आजवरची प्रकाशित ग्रंथसंपदा नमूद केलेली आहे तर मलपृष्ठाच्या घडीवर त्यांची आगामी प्रकाशित होणारी साहित्य संपदा नमूद केलेली आहे. मलपृष्ठावर वसंत केशव पाटील यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे . प्रा . यशवंत माळी यांनी हा कथासंग्रह त्यांच्या सर्व कथांचे पहिले वाचक व सहृदय मित्र असणाऱ्या कै . रामचंद्र कोरे (गुरुजी ) यांना अर्पण केलेला आहे . या कथा संग्रहात एकूण सोळा कथा आहेत . या कथासंग्रहाच्या निमित्ताने व्यक्त केलेल्या मनोगतामध्ये प्रा . यशवंत माळी यांनी त्यांची बालपणापासूनची जडण घडण व्यक्त केलेली आहे . ही जडणघडण वाचकाच्या हृदयाला स्पर्श करून जाते . या कथासंग्रहातील पहिलीच कथा ही कथासंग्रहाचे शिर्षककथा ‘ उलघाल ‘ ही आहे. ‘ ‘उलघाल ‘या शब्दाचा अर्थ अस्वस्थता , बैचेन, असमाधान तसेच ताप, तहान, भूक, पित्त आणि मृत्यू समय इत्यादी वेळी होणारी शरीर मनाची स्थिती होय . माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घटना घडत असतात ज्या प्रसंगात माणसाच्या मनाची उलघाल होत असते . हे प्रसंग अथवा घटना पचवता आल्या तर माणूस कणखर बनतो परंतु पचवता नाही आल्या तर माणूस आत्महत्येसारखे आत्मघातकी पाऊल उचलतो . मानवी मनाची ही अवस्था माणसाच्या भावनिक संघर्षाची असते . हा भावनिक संघर्ष वयाच्या प्रत्येक टप्प्यावर . चालू असतो . या कथा संग्रहात मनाची उलघाल व्यक्त करणारी सर्व वयाची पात्रे भेटतात . यु के जीत शिकणाऱ्या स्पृहा ही या कथा संग्रहातील सर्वात लहान वयाचे तर स्वतः च्या पेन्शनवरही स्वतःचा हक्क नसणारे पापामास्तर हे सर्वात वृद्ध पात्र या कथा संग्रहात येते . या सर्व पात्रांच्या मनाची उलघाल ही नेमक्या प्रसंगातून मनोव्यापाराच्या चित्रणातून स्पष्ट होते . या कथासंग्रहातील प्रत्येक कथेतील पात्रांमध्ये पात्रांच्या वर्तनाचा गुंता वाचकाला अंतर्मूख करतो . . ‘उलघाल ‘ कथेतील अबोली आणि मनजीत तारुण्यावस्थेत अनुभवायला येणाऱ्या प्रेमाच्या उलघालीने अस्वस्थ असतात . ‘नैतिकतेच्या मर्यादा न ओलांडता काळजी घेणं ‘ ही प्रेमाची परिभाषा शिकवणारी ही कथा आहे . ‘ न सुटलेले कोडे ‘ या कथेत माया इनामदार या तरुण मुलीच्या मनाची उलघाल आहे . ही उलघाल क्रूर नियतीने दु :खातच रमून स्थिर उभे रहायला शिकवणारी आहे . एकीकडे नैतीक अनैतिकतेचा सोस या कथेत फोल ठरतो तर दुसरीकडे मायाच्या वर्तमान जीवनाची अवस्था भविष्य उद्धवस्त करत जाणारी वास्तविकता वाचकाच्या मनाची उलघाल वाढवते . तर ‘थायलंडची तूळस ‘ या कथेतील ‘किमी ‘ हे पात्र लेखकावर मनस्वी प्रेम करणारं आहे . किमीच्या मनातील प्रेमाची पूर्तता करणारं लेखकाचं व्यक्तीमत्व तिच्या मनाची उलघाल वाढवतं .या प्रेमाला भाषा आणि प्रांताच्या मर्यादा भेदू शकत नाही . एक सात्वीक प्रेम व्यक्त करणारी ही कथा आहे. ‘पंचमवेद ‘ही कथा शाळेतल्या शिक्षीकेच्या स्पृहा प्रती असणाऱ्या निर्भेळ प्रेमाची आहे . श्रीमंतीच्या थाटात वावरणारा स्पृहाच्या बापाच्या मनाचा अहंकार गळून लेकीप्रती संवेदना जागृत करण्यात अश्विनी मॅडम यशस्वी होतात . नियतीच्या क्रूरतेचे आणि मानवाच्या प्रवाह पतितेचे बळी ठरलेले पात्र स्पृहा हे वाचकाच्या मनात घर करून जाते . ‘इच्छामरण ‘ ही कथा माणसाच्या अंगात धडाडी असली तरी शरीरभोग वाटयाला आलेले दुःख माणूस मुकाट्याने सोसत असतो . नव्हे त्याला ते सोसणच भाग असतं . पण परिस्थिती पुढे आयुष्यभर कणभरही मान न तुकवणाऱ्या साहेबरावांना ब्लडकॅन्सरने त्यांच्या जीवनाचा केलेला पराभव मान्य होत नाही . मनाच्या उलघालीचा शेवट ते स्वतः ला इच्छामरणाच्या हवाली करून करतात . . ‘ दिशाहीन ‘ ही कथा वाचकाच्या अंतर्मनाची घालमेल वाढवते . या कथेतील अविनाश हा विद्यार्थी गोसावी मास्तरांच्या अंगावर पेट्रोलची बाटली फोडून काडी फेकतो . त्यात ते भाजतात . असह्य वेदनेच्या थारोळ्यात तडफडत असणा-या गोसावी मास्तरांना अविनाश जेव्हा पाहतो तेव्हा गोसावा मास्तर भाजलेल्या मांसाच्या गोळ्याचा अवस्थेत दिसतात . ते पाहून त्याला चर्रर्र होतं .गोसावी मास्तरांची पत्नी ‘ पेट्रोल टाकून शर्टाला काडी लावणारा विद्यार्थी होता हे पोलिसांना का सांगत नाही ? ‘ असे विचारत असते . तेव्हा गोसावी मास्तरांच्या उत्तराने अविनाश पश्चातापाच्या खोल गर्तेत हरवतो आणि त्याच्या मनाची उलघाल लौकीक अर्थाने त्याला दिशाहीन बनवते . ‘ स्थलांतर ‘ या कथेतील करकोचाच्या मृत्यूने स्वतःच्या नशीबावर चडफडणारी मादी एकटीच स्थलांतराला सिदध होते . हे तिच एकटेपण नकोसं असलं तरी कधी कधी माणूस नशीबा पुढं हतबल होतो आणि पुन्हा उभा राहतो याच ते प्रतिक आहे . ‘निर्णय ‘ या कथेतील माधवराव आणि प्रमिला हे समाजातील सर्वत्र दिसणारे सर्व समावेशक पात्र आहेत . मूल होत नाही म्हणून माधवराव दुसर्या लग्नाचा घाट घालतात तेव्हा नसणार्या चुकीची शिक्षा भोगण्यापेक्षा कधीही घराबाहेर न पडलेली प्रमिला माधवरावाला कायमचं सोडून जाण्याचा निर्णय घेते . हा निर्णय तिचा करारीपणा अधोरेखित करतो . या निर्णयानं तिच्या मनाची उलघाल थांबते . या कथासंग्रहातील पात्रे रोजच्या जगण्यातील असली तरी इरसाल ,बेरकी , नियती – अनियतीच्या कचाट्यात न अडकता स्वतः चा मार्ग शोधणारी आहेत . कथेतील घटना व त्यानुसार आलेली पात्रे कथेची आशयघनता दाट करतात . सरळ साधे संवाद वाचकाच्या काळजाला भिडतात त्यामुळे या कथा अधिक प्रवाही ठरतात. ‘निर्णय ‘ , इच्छा मरण या कथांमधून विलक्षणतेचा अवलंब दिसून येतो . आशय दृष्ट्या मध्यमवर्गीय संस्कारास ‘उलघाल ‘ ,’निर्णय ‘, ‘ थायलंडची तुळस ‘ , ‘ पंचमवेद ‘ , ‘ सावली ‘ ‘ सत्कार ‘ .या कथा अपवाद ठरून या कथा मानवी जीवनाच्या शाश्वत मूल्यांकडे प्रवास करतात . या कथासंग्रहातील कथांमध्ये भोवतालच्या वास्तवात पात्रांनी धारण केलेले मुखवटे गळून पडतात आणि वाचक स्वतः च मानवी मनाच्या उलघाल या अवस्थेत हरवतो . या कथा संग्रहातील अनेक पात्रे प्रश्न बनून मनात घर करून राहतात . आशा – आकांक्षाच्या प्रतिबिंबासह मानवी जीवनाचा तळठाव शोधण्याचा प्रयत्न या कथा करतात . जीवनाविषयीच्या आसक्तीचे आकर्षण कमी करून मनाच्या गाभार्यात या कथेतील पात्रे प्रवेश करतात . सुक्ष्म निरीक्षणे नोंदवत मानवी जीवनातील विसंगतीवर बोट हा कथासंग्रह ठेवतो . मानवी मनाची घालमेल अधोरेखित करणारा हा कथासंग्रह वाचकाचे अनुभव विश्व निश्चितच समृद्ध करतो . मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा हा कथासंग्रह मराठी मानसशास्त्रीय कथांविश्वात मैलाचा दगड ठरेल यात शंका उरत नाही . प्रत्येकाने वाचावे व जीवनाचे अंतरंग समजून घ्यावे असा हा कथा संग्रह आहे.
रचना यांच्या ‘एका वाडीची गोष्ट ‘(कादंबरी ) या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा श्री . ना . पेंडसे पुरस्कारा सहित इतर आठ राज्यस्तरीय पुरस्कार. ‘बयोच्या कविता‘ हा त्यांचा आगामी काव्यसंग्रह प्रकाशित होत असून ‘सरत्या वसंताच्या गोष्टी‘ आणि ‘स्वयंप्रभा‘ ( दोन अनुवादित कथा संग्रह ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी उत्कृष्ट वाङमय पुरस्कार. याखेरीज त्यांचा स्त्री जाणिवा आणि स्त्री संवेदन (समीक्षा ) ग्रंथ प्रकाशित आहे. ८ व्या मराठवाडा साहित्य संमेलन कवीसंमेलनाच्या सत्राध्यक्ष म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. ‘साहित्याक्षर‘च्या त्या संस्थापक सदस्या व समन्वयक आहेत.