Sahityakshar Prakashan

photo gallery
अक्षर वैभव पुरस्कार वितरण

अक्षर वैभव पुरस्कार वितरण

सेवेतून संस्कृती उदयाला आली : शिरीष चिटणीस*

नगर : माणसांनी एकमेकांची सेवा केली आणि संस्कृती उदयाला आली, असे प्रतिपादन सातारा येथील उद्योजक शिरीष चिटणीस यांनी केले. निमित्त होते अक्षरवैभव पुरस्कार वितरणाचे.
साहित्याक्षर प्रकाशन आणि अक्षरवैभव या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रहेमत सुलतान हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी साहेबराव ठाणगे,आबा सो उमाप, पुंजाहरी सुपेकर, बाळासो. चव्हाण यांना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. सुधाकर शेलार आणि अर्चना डावखर यांना पदमश्री विखे पाटील पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी साहेबराव ठाणगे यांनीसत्काराला उत्तर देताना'साहित्याक्षरचा पुरस्कार हा घरचा पुरस्कार आहे' वाल्याच्या पापात सहभागी न होता त्याचा वाल्मिकी होण्यास मदत करणारी पहिली स्त्री होती ' असे प्रतिपादन केले .

डॉ . सुधाकर शेलार यांनी सन्मानाला उत्तर देताना प्रतिपादन केले की, 'आधुनिकीकरणामुळे अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आणि आपण हातामध्ये रिमोट घेऊन रममाण झालो यात सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले .दुर्लक्ष झालेल्या प्रश्नांकडे समाजाला घेऊन जाण्याचे काम साहित्यिक करत असतो . '
आबासाहेब उमाप यांनी 'दलित आत्मकथनामध्ये बापाची भूमिका महत्त्वाची आहे . ती साहित्यात अधोरेखित झाली पाहिजे 'असे प्रतिपादन केले पुंजाहरी सुपेकर यांनी सत्काराला उत्तर देताना साहित्याक्षरचे आभार मानले आणि साहित्याक्षरने यानिमित्ताने आपल्याला प्रोत्साहन दिल्याचे सांगितले .बाळासाहेब चव्हाण यांनी 'शेतकरी कायमच कर्जबाजारी कसा ?हा मध्यमवर्गीय आणि शेतकर्यापासून दूर असणाऱ्या लोकांना पडलेला प्रश्न ,शासनाचे दुर्लक्ष, शेतीमाल विक्रीतील दलाल यामुळे शेतकरी हतबल झाला आहे .काहीही झालं तरी शेतकऱ्याला उद्योजकासारखं पळून जाता येत नाही . असे सांगत साहित्या क्षरचे आभार मानले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रचना यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'आईपणाच्या कविता 'हा कार्यक्रम झाला . यात आई ही थीम घेवून सर्व कवींनी कविता सादर केल्या .या कार्यकमाचे सुत्रसंचालन डॉ. संजय बोरुडे यांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत अनेक किस्से सांगत आणि कविता . गात केले ., सुनील पवार, सुरेखा घोलप , ओम प्रकाश देंडगे, अर्चना डावखर , साहेबराव ठाणगे , दशरथ शिंदे रचना, संजय नगरकर आदी कवींनी बहारदार कविता सादर केल्या.
आभार डॉ. सय्यद महेबूब यांनी मानले.

याखेरीज डॉ. सूर्यकांत वरकड, पोपट पवार, विजय हाळगावकर या वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रचना, शब्बीर शेख आणि डॉ.महेबूब सय्यद यांनी यशस्वीपणे केले.

photo gallery
साहित्याक्षर च्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘ अन्वयांची . अक्षरलिपी’ या काव्यसंग्रहाचा देखणा कार्यक्रम

साहित्याक्षर च्या वतीने प्रकाशित केलेल्या ' अन्वयांची . अक्षरलिपी' या काव्यसंग्रहाचा देखणा कार्यक्रम

साहित्याक्षर च्या वतीने प्रकाशित केलेल्या ' अन्वयांची . अक्षरलिपी' या काव्यसंग्रहाचा देखणा कार्यक्रम आता साताऱ्यामध्ये पाठक हॉलला सुरू आहे.डावीकडून अंजली डमाळ, दत्तप्रसाद दाभोळकर, किशोरजी बेडकिहाळ, मी आणि कवयित्री डॉ. राजश्री देशपांडे

photo gallery
साहित्याक्षर प्रकाशन व कलाक्षर साहित्य मंच मनमाड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे

साहित्याक्षर प्रकाशन व कलाक्षर साहित्य मंच मनमाड यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे

photo gallery
दक्षिण मराठी साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष पुरस्कार स्वीकारताना लेखक प्रा.यशवंत माळी

दक्षिण मराठी साहित्य सभा कोल्हापूर यांचा विशेष पुरस्कार स्वीकारताना लेखक प्रा.यशवंत माळी.

"परतीचा पाऊस" या ग्रामीण कथासंग्रहाला हा पुरस्कार मिळाला . सदर संग्रह साहित्याक्षर ने प्रकाशित केला आहे . संशोधक , अभ्यासक , विद्यार्थी आणि साहित्याक्षरच्या सभासदांना ४० टक्के सवलतीत मिळेल. संपर्क : ९७६७५१६९२९

photo gallery
कवी नव्हे कविता मोठी झाली पाहीजे .

कवी नव्हे कविता मोठी झाली पाहीजे

या साहित्याक्षर प्रकाश ना च्या उपक्रमा अंतर्गत हा ४ था कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ठ रित्या पार पडला . या साठी गोविंदलाल कन्हैय्यालाल जोशी रात्र महाविद्यालय , कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण , प्रमुख कवी ज्यांच्या कवितेने उपस्थित रसिकांची मने जिंकली ते आबासाहेब पाटील , समन्वयक नयन भादुले, कवी संमेलनाध्यक्ष योगीराज माने , प्रमुख पाहुणे रमेश चिल्ले सुत्र संवादक कवयित्री शैलजा कारंडे लातूर परळी अंबाजोगाई माजलगाव नांदेड आदी परिसरातून आलेले कवी व रसिकांचे .. साहित्याक्षर प्रकाशनाकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत . कवी मोहन राठोड जेष्ठ कवयित्री छाया बेले , सुजाता भोजने शिवकन्या साळुंखे सुलक्षणा सरवदे, . विशाल अंधारे आदी सर्वच कवींचे मनःपुर्वक धन्यवाद