Description
आपल्याकडचे बहुतेक बालसाहित्य हे उपदेशप्रधान आहे. मोठ्यांनी मुलांना काय आवडेल, याचा एकतर्फी विचार करून लिहिलेले आहे. म्हणजे यात मुलांना गृहीत धरलेले आहे. त्यामुळे ते एकप्रकारे लादलेले आहे, असे अनेक आक्षेप आहेत. तीच गोष्ट कुमार साहित्याची आहे. साहसकथांचा तुरळक अपवाद वगळता रहस्य कथा, गूढकथा, संदहकथा, कूटकथा, ग्रामीण कथा आणि भयकथा या स्वरूपाचे कुमार साहित्य आपल्याकडे निर्माण होत नाही. पूर्वी बिरबल, टारझन सारखी मासिके हे काम बऱ्यापैकी करत होती पण आता तशी मासिके निघत नाही. त्यामुळे आपल्याकडच्या कुमार वाचकांना नाईलाजाने इंटरनेटचा आधार घ्यावा लागतो.
‘आहट’ सारखी भीतीदायक मालिका कुमार प्रेक्षकांनी उचलून धरली होती, असे एका तत्कालीन सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. तसेच सी. आय. डी., परमवीर सारख्या मालिकांचा टी. आर. पी. कुमारांनीच वाढवला होता. यांचे कारण म्हणजे कुमारांना जे हवे तसे साहित्य आपल्याकडे निर्माण होत नाही, हेच आहे. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये मात्र अशा साहित्याची रेलचेल आहे. स्वतंत्र टी. व्ही. चॅनेल्स आहेत, हॉरर् शोज आहेत. त्यामुळे ती मुले निर्भय होतात. कारण त्यांचा ‘भय’ नावाच्या भावनेचा परिपोष होतो, असे मत प्रख्यात भयकथा लेखक नारायण धारप यांनी व्यक्त केलेलं आहे. आपल्याकडे या प्रकारच्या साहित्याची वाणवा असल्याने इकडच्या मुलांच्या ‘भय’ नावाच्या भावनेचा पुरेसा परिपोष न झाल्याने त्यांच्यातल्या भीतीचा निचरा होत नाही.
या दृष्टीने संजय बोरुडे यांच्या प्रस्तुत ‘हवेलीचे रहस्य‘ या कुमार कादंबरीकडे पाहणे आवश्यक आहे.
Reviews
There are no reviews yet.