Description
डॉ.संजय बोरुडे हे चतुरस्त्र लेखक आहेत. त्यांनी अनेक वाङ्मय प्रकार हाताळले असून इतिहास , संस्कृती आणि लोकसाहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास आहे .
परंपरेन चालत आलेल्या लोकजीवनामध्ये जे साहित्य, वाड्मय तयार होते ज्यात लोकगीते , लोककथा , दैवतकथा अशा अनेक बाबींचा होतो . अशा लोकश्रद्धा ,रुढी, प्रथा आणि त्यामागचे लोकमानस यांचा वेध घेणारा हा मह्त्वाचा ग्रंथ आहे .
या निमित्ताने डॉ. संजय बोरुडे यांनी लोकसाहित्यात कधीही न आलेले चिन्हसंकेत, उत्खननातून प्रतीत होणारे लोकजीवन असे अनेक महत्त्वाचे विषय हाताळले आहेत.
अभिजात साहित्य जेव्हा थकते तेव्हा ते लोकसाहित्यातून ऊर्जा घेते. लोकसाहित्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि व्यावहारिक शहाणपण मिळते असे अनेक महत्त्वाचे सिध्दांत त्यांनी यात मांडले आहेत.
लोकसाहित्यामध्ये ज्या अभ्यासकांना नवी प्रमेये शोधायची असतील असे अभ्यासक आणि लोकसाहित्यात रुचि असणाऱ्या प्रत्येक रसिकाने हा ग्रंथ वाचायलाच हवा .
Reviews
There are no reviews yet.