Description
- पुस्तकाचे नाव : पौर्णिमा
- भाषा : मराठी
- कवी/लेखक : प्रा.दिलीपकुमार गणपतराव मोहिते
- प्रकाशन : परिसस्पर्श पब्लिकेशन
- प्रकार : कविता संग्रह
- आय एस बी एन : 978-81-955782-1-4
शब्दांचं अलौकिक सामर्थ्य लाभलेले कवी प्रा.दिलीपकुमार मोहिते पत्नीच्या निधनानंतर पत्नीला समर्पित कवितांचा संग्रह काढतात इथेच या कवींच्या काळजात दडलेला ओलावा लक्ष्यात येतो.. स्वत: शिक्षकी पेशात आयुष्य जगलेल्या या कवींच्या पुस्तकात आपल्याला शाश्वत प्रेम, विरह, स्मृतींच्या ठस्यांनी दंश करणारा नाग आणि टेकडीवर अस्वस्थ एकटं प्रतीक्षेचं झाड
भेटतं.
साध्या सोप्या तरल शब्दात अवाजवी गुंता टाळून विलक्षण प्रतिमांच्या बळावर प्रसवलेले अंतरंगातील उत्कट भाव वाचकांना सहज आपलंसं करतात.. दोघांनी मिळून उभारलेल्या स्वप्नांच्या आकाशात एकटा पडलेला चंद्र लांघून जाण्याच्या प्रयत्नांत दिसतो -आसवांची नदी.
शब्दांच्या झुल्यावर कसरत करायला शिकवणारी सखी जरी हयात नसली तरी, या शब्दवेड्या मुशाफिराच्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर दरवळत राहते त्याची चांदवेडी “पौर्णिमा”.
वळीवाचा पाऊस ओसरल्यावर उरलेल्या मातीच्या सुगंधा सारख्या कवितांना माझ्या अनंत शुभेच्छा !!
-अनंत विठ्ठल राऊत
Reviews
There are no reviews yet.