Description
- पुस्तकाचे नाव : ज्ञानगीता
- भाषा : मराठी
- कवयित्री/लेखिका : विजया पाटील
- प्रकाशन : परिसस्पर्श पब्लिकेशन
- प्रकार : कविता संग्रह
- आय एस बी एन : 978-81-940409-0-3
कविता निर्माण होत असताना खूप मोठा आशय छोट्या शब्दांमध्ये पकडण्यासाठी जी प्रतिभा लागते ती प्रतिभा या ‘ज्ञानगीता’ नावाच्या कवितांच्यामध्ये आढळून येते. कवयित्रीनी हे काव्य लिहीत असताना खूप मोठा आशय प्रत्येक शब्दांतून व्यक्त केलेला आहे.मानवी जीवन सुसह्य व्हावं; मानवी जीवन आनंदी व्हावं, मानवी जीवन प्रकाशमान व्हावं यासाठीचा प्रयत्न या प्रत्येक कवितेतून कवयित्रीने केलेला आहे.मुळात ‘गीता’ जन्माला आली तीच मानवी जन्माच्या कल्याणासाठी आली. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे अनेक मार्ग सांगीतले आणि परमेश्वराची अनुभूती सांगितली ती मूळ गीतेमध्ये सांगीतली. मूळ गीतेमध्ये ज्ञानयोग आहे; कर्मयोग आहे, भक्तीयोग आहे. अनेक योगांच्या माध्यमातून ‘त्याला’ कसं प्राप्त करावं याच्या विषयीचं तत्त्वज्ञान मूळ गीतेमध्ये मांडलेलं आहे.या ज्ञानगीतेमध्ये कवयित्रीने जीवनाचा उद्देश काय असावा? जीवनाची सफलता कशामध्ये आहे ? जीवन सुसंगत आणि सुसह्यपणे कसं जगता यावं याच्या विषयीचं सुंदर आणि मार्मिक शब्दांमध्ये विवेचन केलेलं आहे.अवघ्या चार ते आठ शब्दांमध्ये एक ओवी संपते आहे. म्हणजे खरंतर खूप मोठा आशय कमीत कमी शब्दांमध्ये पकडण्याची क्षमता या कवयित्रीमध्ये आहे. यातील एक एक ओवी वाचत असताना असं लक्षात येतं की ती सहज उलगडतेय, त्याच्यामध्ये कुठं क्लिष्टता नाही.तिथं भाषेचं अवडंबर नाही एक सहजता आहे आणि या सहजतेतून सामान्य माणसापर्यंत जीवनाचा संदेश या कवितांच्या मधून पोहोचतो आहे.ही कविता संस्कारक्षम माणूस कसा व्हावा? त्याच्या जीवनाची ध्येयं कोणती असावीत आणि त्यानं स्वत: जगून इतरांना आनंदी कसं करावं? याचा बोध या कवितांतून कवयित्रीनी दिलेला आहे. – इंद्रजीत देशमुख
Reviews
There are no reviews yet.